राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज ९९ वर्ष पूर्ण झाले असून या संघटनेने १००व्या वर्षात पदार्पण केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्त विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.