“मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा!” राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राच चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या वापरासाठी केलेल्या आंदोलनाबद्दल मनसैनिकांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरल्याबद्दल कौतुक केले आणि आता हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी सरकारला रिझर्व्ह बँकेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे सांगितले. तसेच, मराठी माणसाचा अपमान झाल्यास मनसैनिक पुन्हा चर्चा करायला जातील असा इशाराही दिला.