अशीही श्रद्धांजली! जो पुरस्कार प्रदान केला त्याला देण्यात आलं रतन टाटांचं नाव
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने 'उद्योगरत्न पुरस्कार' या पुरस्काराला रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे नाव दिलं आहे. रतन टाटांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.