“बीड पोलीस ठाण्यात पाच नवे पलंग कशासाठी मागवले?”, रोहित पवारांचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बीड पोलीस ठाण्यात नवीन पलंग मागवण्यावरून प्रशासनावर उपरोधिक टीका केली आहे. कराडने स्वतःवरील आरोप फेटाळून लावत, दोषी आढळल्यास शिक्षा भोगण्याची तयारी दर्शवली आहे.