“सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते, अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या आरोपीला ठाण्यातील जंगलातून अटक करण्यात आली आहे. तो बांगलादेशी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, तपास पोलीस करत आहेत, भाजपाने नाही. सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर भाजपाने राजकारण करणं चुकीचं आहे. रोहिंगे आणि बांगलादेशी आल्यास अमित शाहांनी जबाबदारी घ्यावी.