संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; “ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी…”
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी सांगितले की, या समाधीचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवप्रेमींच्या मागणीनुसार, ३१ मे २०२५ पर्यंत ही कपोलकल्पित समाधी हटवावी, असे संभाजीराजे म्हणाले.