“…तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांची मागणी, एकनाथ शिंदेंना सल्ला
संजय राऊत यांनी महायुती सरकारवर शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांवरून टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत नकारात्मक वक्तव्य केल्याने राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंच्या मेळाव्याबाबत राऊत यांनी भाजपशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर टीका केली आणि मराठी माणसाला कमजोर करणारी भूमिका न घेण्याचे आवाहन केले.