“हिंदुत्त्ववाद्यांना तैमुर चालतो”, सैफ अली-पंतप्रधानांच्या ‘त्या’ भेटीवरून राऊतांची टीका!
संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैफ अली खानवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, तर तैमुरच्या नावाने मुलाचं नाव ठेवणाऱ्या सैफ अली खानचं मोदींनी कौतुक केलं. तसेच, लालकृष्ण आडवाणींची अवस्था शाहजहांसारखी एकांतवासात ठेवली असल्याचंही त्यांनी म्हटलं.