“सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करावी”, संजय राऊतांचं आवाहन, RSS चा उल्लेख करत म्हणाले…
संजय राऊत यांनी नागपूर हिंसाचारावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून दंगली का होत आहेत, हा संशोधनाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी सरकारवर आरोप केला की, भाजपाच्या सत्तेतही दंगली होत आहेत. राऊतांनी आरएसएसवरही टीका करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा आरोप केला.