“स्मृती इराणींना आंदोलनासाठी सिलिंडर आम्ही पुरवतो..”; दरवाढीवरुन संजय राऊत यांचा टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी स्मृती इराणी यांना आंदोलन करण्यासाठी बोलावलं आहे. राऊत म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या असताना भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवणे हे सामान्य माणसांची लूट आहे. त्यांनी भाजपावरही टीका केली आहे.