संतोष देशमुख यांची मुलगी भावूक; म्हणाली, “माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, मी…”
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्येच्या मास्टरमाईंडला कठोर शिक्षा होईल असे विधान केले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात शरद पवार सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीने, वैभवीने, वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे.