“सरपंच संतोष देशमुखांची हत्या जातीवादातून नाही”, भावाने स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. जातीयवादातून हत्या झाल्याचा आरोप असला तरी, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ही हत्या जातीयवादातून नाही तर असुरी प्रवृत्तीमुळे झाली आहे. त्यांनी राजकारणी आणि समाजकारण्यांनी न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.