‘फोनवर आता ‘हॅलो’ नाही, तर ‘जय शिवराय’ बोला’, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्याचा सल्ला
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर राजकीय चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने 'जय शिवराय' ही घोषणा सुरू केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगलीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना फोनवर 'हॅलो' ऐवजी 'जय शिवराय' म्हणण्याचे आवाहन केले.