सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; राज्य सरकारकडे बोट दाखवत म्हणाले…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. डॉक्टरांनी सैफला सहा जखमा झाल्याचं सांगितलं असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.