“कालपर्यंत संघ, सावरकरांना शिव्या देणारे आज…”, संजय राऊतांची भाजपाच्या नेत्यावर टीका
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १९४७ पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फारसा फरक नाही. संघ परिवाराचे नियंत्रण सुटले असून ते दंगली घडविणे, मशिदीवर हल्ले करणे यासारखी कृत्ये करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना, सरकार हलाल आणि झटका मटण यावर वातावरण दुषित करत आहे.