बलात्कार पीडितेबद्दलच्या विधानावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सारवासारव; म्हणाले…
पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. योगेश कदम यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत विधानाचा विपर्यास झाल्याचे सांगितले.