टॅक्सी, ऑटो-रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारची गुड न्यूज; ‘इतक्या’ हजारांचे अनुदान लागू
महायुती सरकारने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ६५ वर्षे वयाच्या आणि अधिक वयाच्या चालकांना १० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ १४,३८७ चालकांना मिळणार आहे.