सुधीर साळवींच्या खांद्यावर उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्त केले आहे. साळवी यांना या पदावर नियुक्त केल्याने लालबाग परिसरातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राजकीय चर्चा रंगली आहे. साळवी यांचे गणेशोत्सव मंडळातील योगदान आणि निष्ठा लक्षात घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.