“मी माझ्या भूमिकेवर ठाम”, वादग्रस्त वक्तव्यानंतर सुजय विखेंचं स्पष्टीकरण
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी साई संस्थानच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करून पैसे आकारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया आल्या. विरोधकांनी टीका केली, परंतु सुजय विखे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण देत प्रसाद निःशुल्कच राहील असे सांगितले. सुजय विखे यांनी भिक्षेकऱ्यांच्या समस्येवर लक्ष वेधले आणि मुलींच्या शिक्षणासाठी निधी वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली.