रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, सुप्रिया सुळेंची सरकारला जाब विचारणारी पोस्ट!
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची मुक्ताई नगर भागात छेड काढल्याची घटना घडली. या घटनेवर रक्षा खडसे यांनी संताप व्यक्त केला असून, सुप्रिया सुळे यांनी सरकारला जाब विचारला आहे. आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे सांगितले.