“बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या…
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आमदार पंकजा मुंडे यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. बीड आणि परभणीतील गुन्हेगारीच्या घटनांवर राजकारण न करता माणुसकीच्या नात्याने न्याय मिळवण्याची मागणी केली. वाल्मिक कराडच्या कृतीमुळे बीड बदनाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.