“मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्याबाबत सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येणार आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांना आमंत्रण मिळाले असून त्या उपस्थित राहणार आहेत. जय पवार यांचे लग्न ऋतुजा पाटीलशी होणार आहे, त्या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत.