शरद – अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर सुळे स्पष्टच म्हणाल्या, “माझ्या कुटुंबाबाबत…”
शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली होती. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "मी लोकप्रतिनिधी आहे, मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही. माझं कुटुंब वेगळं आहे आणि मी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात कधीच गल्लत करत नाही." आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.