Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा संशय असलेला आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुण्यात सर्वपक्षीय मोर्चात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही असे सांगितले. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आणि बीड जिल्ह्यातील परिस्थितीवर टीका केली. बीडची परिस्थिती हमास आणि तालिबानसारखी झाली आहे असं त्यांंनी म्हटलं आहे.