Sushma Andhare Maharashtra Election 2024
1 / 30

पुण्यात नवी कार्यालये, बैठकांनाही जोर; सुषमा अंधारे निवडणूक लढवणार का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याबाबत खुलासा केला. त्या पुण्यात निवडणूक लढवणार नसून पक्षासाठी काम करणार आहेत. हडपसरची जागा शिवसेना (ठाकरे) लढणार असून महादेव बाबर उमेदवार असतील, असे अंधारे यांनी जाहीर केले.

Swipe up for next shorts
salman khan will shoot weekend ka vaar of bigg boss 18 during threats from gangsters Lawrence Bishnoi
2 / 30

Bigg Boss 18 : लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीला न घाबरता सलमान पोहोचला ‘वीकेंड वार’च्या शूटिंगला

Bigg Boss 18 : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली. बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या ६ दिवसांनंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील एका व्यक्तीने धमकीचा मेसेज केला असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितदेखील भाईजानने आपली प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान ‘बिग बॉस १८’च्या ‘वीकेंड वार’च्या शूटिंगला तयार झाला आहे.

Swipe up for next shorts
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024
3 / 30

महाराष्ट्रात ३१ जागांवर ‘खेला’ होणार? ‘काठावरच्या’ मतदारसंघांत कुणाची होणार सरशी?

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २८८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून ३१ जागा किंगमेकर ठरू शकतात. २०१९ च्या निवडणुकीत या ३१ मतदारसंघांमध्ये विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये पाच हजारांहून कमी मतांचं अंतर होतं. महाविकास आघाडीला १५८ आणि महायुतीला १२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.

Swipe up for next shorts
prakash ambedkar allegation on sharad pawar
4 / 30

“…तेव्हा शरद पवारांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा!

मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंतर आता खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Mahayuti CM Face
5 / 30

जागा वाटप होईना, मुख्यमंत्रीपद ठरेना; महायुतीत चढाओढ, शिवसेनेच्या बैठकीत काय ठरलं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पक्षस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत महाविकास आघाडीत विसंगती असून महायुतीतही अंतर्गत धुसफूस सुरू आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी झाली. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचं सरकार पुन्हा आणण्याचं उद्दिष्ट सांगितलं. मनीषा कायंदे यांनी महायुती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.

Adinath Kothare bathed with cooler water during the shooting of Paani movie
6 / 30

“कुलरच्या पाण्यात अंघोळ…”, आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या शूटिंगचा सांगितला किस्सा

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता 'पाणी' चित्रपट आजपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या आणि या समस्येला सामोरे जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर 'पाणी' चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी सांभाळली आहे. नुकताच आदिनाथ कोठारेने 'पाणी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला.

JNU plans Shivaji centre
7 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. शिवरायांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू होणार असून, अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाईल. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू होईल. भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध यावर भर दिला जाईल. पहिल्या पाच वर्षांत १५ ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Rakul Preet singh Injured due to deadlift severe back spasm and pain know actress health update and doctors review
8 / 30

“गेले सहा दिवस मी बेडवर…”, रकुल प्रीत सिंगला झाली गंभीर दुखापत, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

गंभीर दुखापतीमुळे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या बेड रेस्टवर आहे. एएनआयने वृत्त दिले आहे की, “८० किलोच्या डेडलिफ्टदरम्यान पाठीत दुखल्यामुळे ही दुखापत झाली आहे.” अभिनेत्रीने याबाबत तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर एक अपडेट शेअर केलं आहे, जिथे तिने तिच्यासमोरील आव्हाने शेअर केली आणि आपल्या शरीराचे ऐका असं सांगण्यावर जोर दिला.

cyber fraud
9 / 30

धक्कादायक! ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे म्हणत तरुणीला कॅमेऱ्यासमोर विवस्र होण्यास भाग पाडलं

अंमलीपदार्थविरोधी कायद्याचा धाक दाखवत एका अज्ञात व्यक्तीने २७ वर्षीय तरुणीला ५ लाख रुपयांनी गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही, 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे म्हणत त्यांनी तिला कॅमेरासमोर विवस्र होण्यास भाग पाडल्याचंही पुढे आलं आहे. १३ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये ही घटना घडली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Zeeshan Siddique Meets Devendra Fadnavis
10 / 30

झिशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात ‘या’ चर्चांना उधाण

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर, देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. पोलिसांनी झिशान सिद्दीकींचा जबाब नोंदवला असून, फडणवीसांशी त्यांच्या चर्चेची उत्सुकता आहे. झिशान सिद्दीकींनी एक्सवर पोस्ट करून वडिलांच्या मृत्यूचं राजकारण न करण्याची विनंती केली आहे. या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

The FBI has issued a ‘wanted’ poster with three images of Vikas Yadav. According to the FBI, a federal warrant of arrest against him was issued
11 / 30

भारताचे माजी रॉ अधिकारी ‘एफबीआय’च्या वाँटेड लिस्टमध्ये; विकास यादव यांच्यावर आरोप काय?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक विकास यादववर अमेरिकेतील एफबीआयने आरोप निश्चित केले आहेत. पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केले असून त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. यूएस अॅटर्नी जनरल मेरिक बी गारलँड यांनी न्याय विभाग अमेरिकन नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल असे सांगितले. एफबीआयने यादवला वॉन्टेड लिस्टमध्ये टाकले आहे.

Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Feature Price Compare
12 / 30

मारुतीला टक्कर द्यायला येणार स्कोडाची एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ?

ऑटो 6 hr ago

Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Compare: चेक रिपब्‍लिक ऑटोमोबाईल निर्माता कंपनी स्कोडा लवकरच त्यांच्या नवीन एसयूव्हीसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. स्कोडा आता देशातील सर्वात प्रसिद्ध सब-फोर मीटर कार विभागात धमाकेदार एंट्री करणार आहे. स्कोडा पुढील महिन्यात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq सादर करणार आहे. बाजारात आल्यानंतर ही कार अनेक मॉडेल्सना टक्कर देईल.

Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
13 / 30

Video: रक्ताळलेला हात घेऊन धुळीत बसलेला याह्या सिनवर! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!

गेल्या वर्षभरात इस्रायल-हमास संघर्ष चर्चेत होता. गुरुवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा म्होरक्या याह्या सिनवार ठार झाला. यामुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलच्या लष्कराने शेअर केलेल्या व्हिडीओत सिनवार गंभीर जखमी अवस्थेत दिसतो. १९८८ ते २०११ तुरुंगात असलेला सिनवार २०१७ मध्ये हमासचा प्रमुख बनला. त्याच्या क्रूरतेमुळे त्याला 'कसाई' म्हटलं जातं.

Rinku rajguru childhood photo with father
14 / 30

फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? जगभरात ११० कोटी रुपये कमावणाऱ्या सिनेमात केलंय काम

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोत रिंकू लहान असताना तिचे वडील तिला कडेवर घेऊन उभे आहेत. तिने 'बेस्ट बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा' असे लिहिले आहे. रिंकूने 'सैराट' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिचे वडील महादेव राजगुरू शिक्षक आहेत. 'सैराट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटी रुपये कमावले होते.

Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary
15 / 30

ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचा पगार किती? जाणून घ्या

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. तिच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड शिवराज असतो, जो अनेक वर्षांपासून बच्चन कुटुंबासाठी काम करतो. शिवराजला ऐश्वर्या राय वार्षिक एक कोटींहून अधिक पगार देते. सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांचाही बॉडीगार्ड सोनूला १.२ कोटी रुपये वार्षिक पगार दिला जातो.

How to Prepare Sugandhi Utane at Home in Marathi
16 / 30
marathi actress pranit hatte reaction on bigg boss marathi season 5 fame ghanshyam darode viral video
17 / 30

“बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, छोट्या पुढारीचा ‘त्या’ व्हिडीओवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचे फोटो, व्हिडीओ हे सतत व्हायरल होताना दिसत आहेत. सहाव्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर झालेला छोटा पुढारी म्हणजे घनःश्याम दरवडेचा ( Ghanshyam Darode ) एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. “मी कधी बिग बॉसच्या घरात राजकारण केलं नाही”, असं वक्तव्य व्हायरल व्हिडीओमध्ये घनःश्याम करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर मराठी अभिनेत्री प्रतिक्रिया दिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Suraj Chavan Gautami Patil Video
18 / 30

‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहिलात का?

सूरज चव्हाण, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता, सध्या चर्चेत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरजने संघर्ष करून यश मिळवले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचा सत्कार केला होता. डान्सर गौतमी पाटीलनेही सूरजची भेट घेतली आणि त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सूरजच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.

Salman Khan was pulled over by a traffic cop who didn't recognise him.
19 / 30

“मी सलमान खान आहे” म्हणत दबंग खानने चालवली होती फूटपाथवर गाडी, पोलिसांनी थांबवल्यावर…;

२००२ साली हिट अॅन्ड रन प्रकरणात सापडलेला सलमान खान पूर्वीपासूनच साहसी होता, असं त्याचा मित्र आसिफ शेखने सांगितलं. १९९८ च्या बंधन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने फूटपाथवर गाडी चालवली होती. एकदा ट्रॅफिक पोलिसाने त्याला पकडलं, पण ओळखलं नाही. तसेच, हैदराबादमध्ये सलमानने मित्राची कार बेदरकारपणे चालवून त्याला घाबरवलं होतं, पण नंतर हसला.

nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
20 / 30

सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला? निक्की तांबोळी म्हणाली…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला, तर उपविजेता अभिजीत सावंत होता. निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. निक्कीने सूरजच्या विजयाबद्दल मतं मांडली, "माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती, पण चाहत्यांनी सूरजला जिंकवलं." तिने शोमध्ये उद्धटपणे बोलल्याची खंत व्यक्त केली. सूरज विजेता होण्यासाठी पात्र होता, असंही निक्कीने नमूद केलं.

Bikaji foods owner Shivratan Agarwal success story he left family business haldiram and started shivdeep food products
21 / 30

फक्त ८ वी शिकून झाले कोटींचे मालक, वाचा शिवरतन अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

कष्ट, अखंड मेहनत व सातत्याने शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. एका लहानशा गोष्टीपासून मोठा व्यवसाय उभारण्यासाठी परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाची साथ असावी लागते. आज आपण अशाच एका हरहुन्नरी व्यक्तीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याने आजोबांच्या एका छोट्याशा दुकानाचं एका मोठ्या ब्रॅंडमध्ये रुपांतर केलं.

indian economy world bank
22 / 30

जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं…”

विरोधक केंद्र सरकारवर बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि मध्यमवर्गाच्या आर्थिक अडचणींवर टीका करत आहेत. मात्र, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक केलं आहे. त्यांनी भारताचा विकासदर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वात उज्ज्वल बाब असल्याचं म्हटलं आहे. यात भारताच्या अंतर्गत बाजारपेठेतील उत्पन्नाचा मोठा वाटा असल्याचंही जागतिक बँकेनं नमूद केलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी काही आव्हानांचाही उल्लेख केला आहे.

Radhika Merchant offers birthday cake to brother-in-law Akash Ambani but he is refused video viral
23 / 30

Video: राधिका मर्चंटकडून आकाश अंबानीने केक खाण्यास नकार का दिला? जाणून घ्या…

गुरुवारी ( १७ ऑक्टोबरला ) अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चंट हिचा ३०वा वाढदिवस होता. लग्नानंतरचा राधिकाचा पहिला वाढदिवस अँटिलियामध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Kamala Harris US Election 2024
24 / 30

“तुम्ही कमला हॅरिस यांना मतदान करणार ना?” अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय एकवटले

अमेरिकन डेमोक्रेटिक फंडरेझने कमला हॅरिस यांच्यासाठी दक्षिण आशियाई मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये विविध दक्षिण आशियाई भाषांचा वापर केला आहे आणि बॉलिवूड प्रेरित गाण्यांचा समावेश आहे. अजय भुटोरिया यांनी सांगितले की, हजारो स्वयंसेवक कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ कार्यरत आहेत. ५० लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन मतदारांसाठी हॅरिस आशेचा किरण आहेत. यासाठी त्यांनी मराठी भाषेतूनही आवाहन केलं आहे.

salman khan life threat lawrence bishnoi gang
25 / 30

“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी; केली ‘ही’ मागणी!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेतलं असून ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा उल्लेख करत, सलमानची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट होईल, असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Who was Yahya Sinwar?
26 / 30

Yahya Sinwar : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार कोण होता? त्याला ‘कसाई’ का म्हटलं जायचं?

इस्रायलच्या लष्कराने हमासचा म्होरक्या याह्या सिनवारला ठार केलं आहे. गाझा पट्टीतील एअर स्ट्राईकमध्ये तीन दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्यात सिनवार होता. ७ ऑक्टोबरच्या नरसंहारासाठी तो जबाबदार होता. सिनवारने २२ वर्षे तुरुंगात घालवली आणि २०१७ पासून हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं. त्याच्या क्रौर्यामुळे त्याला 'कसाई' म्हटलं जातं होतं. २०१५ मध्ये त्याचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं.

Maharahtra Congress
27 / 30

वांद्र्यातून असिफ झकारिया तर, मालाडमधून अस्लम शेख; काँग्रेसची पहिली यादी जाहीर?

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या असून महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी व्हायरल होत आहे, परंतु काँग्रेसने स्पष्ट केले आहे की त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले असून लवकरच योग्य माध्यमांद्वारे यादी जाहीर केली जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

hansika motwani new home gruh pravesh
28 / 30

प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराचे खास Photos

लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने पती सोहेल खातुरियाबरोबर नवीन घर घेतलं आहे. तिने गृहप्रवेशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हंसिका हिरव्या साडीत आणि सोहेल कुर्त्यात दिसत आहेत. दोघांनी एकत्र पूजा करून नवीन घरात प्रवेश केला. सोहेल व हंसिकाने नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न केलं होतं.

jitendra awhad allegation maharashtra government
29 / 30

शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेली बक्षीस अद्यापही दिलं नाही – जितेंद्र आव्हाड

जून महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार केला होता. तसेच त्यांना ११ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केलं होतं. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, आता भारतीय संघातील खेळाडूंना बक्षिसांची ही रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली आहे.

Nawaz Sharif on Pm Narendra Modi
30 / 30

“मोदी पाकिस्तानात आले असते तर…”, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मोठे विधान

पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला भेट दिली. या दौऱ्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा केली. शरीफ यांनी नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले असते तर अधिक आनंद झाला असता असेही म्हटले.