अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार; मुंबई उच्च न्यायालयाचं निरिक्षण!
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात पाच पोलीस जबाबदार असल्याचं नोंदवलं आहे. अहवालानुसार, पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य नव्हता. न्यायालयाने राज्याला या पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.