उद्धव ठाकरेंची टोलेबाजी, “सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता, भाजपाने हिंदुत्व…”
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपाने झेंड्यावरचा हिरवा रंग काढावा किंवा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं असं म्हटलं. सौगात ए मोदी कार्यक्रमावरून त्यांनी भाजपाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. भाजपाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरही त्यांनी टीका केली आणि भाजपाचं ढोंग उघडं पडलं असल्याचं सांगितलं.