उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन रेडा कापतोस…”
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली. "पुण्यात जीबीएस नावाचा रोग पसरतो आहे. तो रोग दुषित पाण्यामुळे पसरतो आहे. उत्तर द्यायला महापालिका कुठे आहे? भाजपाकडेच पुणे महापालिका होती. जा मग नगरविकास खात्यात जे धेंड बसवलं आहे ना त्याला विचारा. काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस, पुणेकरांना दुषित पाण्यातून रोग होत आहेत, जबाबदार कोण? मंत्री असणार, दुसरा कोण? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली