‘दुर्दैव, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं’, देवेंद्र फडणवीसांची भूमिका
मुघल शासक औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी ती कबर उखडून टाकण्याची मागणी केली होती, परंतु राज्य सरकारने इथे सुरक्षा पुरविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही असे सांगितले. तसेच दुर्दैवाने कबरीचे रक्षण करावे लागत असल्याचेही म्हटले.