वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल!
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून ही माहिती दिली. पुढील काही दिवस आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार असून, रेखा ताई ठाकूर प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.