“पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले की, सरदार पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांना कधीही तडीपार केले गेले नव्हते. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर देत विचारले की, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलजी, अडवाणीजी यांच्याबाबतही पवारांनी असेच वक्तव्य केले असते का? तसेच, दाऊदच्या हस्तकांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांपेक्षा अमित शहांची तडीपारी देशभक्तीचे लक्षण आहे, असेही तावडे म्हणाले.