वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी परळीत आंदोलन झाले. वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आणि मुलावर झालेला अन्याय थांबवण्याची मागणी केली. त्यांनी सर्व गुन्हे खोटे असल्याचे सांगितले आणि न्यायाची मागणी केली.