“संतोष देशमुखांना भीती वाटत होती, गुंड प्रवृत्तीचे…”, हत्येच्या दोन दिवस आधी काय घडलं?
बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्की प्रकरणातून हत्या झाली. महिनाभरानंतरही एक आरोपी फरार असून वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही. या मागण्यांसाठी बीडमधील नागरिकांनी आंदोलन केले. संतोष देशमुख यांना धमक्या येत होत्या, असे त्यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी सांगितले. संतोष देशमुख भीतीमुळे लातूरला थांबले होते, पण अखेर गावी परतले आणि त्यांची हत्या झाली.