सैफ अली खानप्रकरणातील आरोपी बांगलादेशी नाही? आरोपीच्या वकिलाची प्रतिक्रिया चर्चेत!
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शेहजादला मुंबई गुन्हे शाखेने ठाण्यातील कांदळवनातून अटक केली. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याला बांगलादेशी असल्याचा दावा केला, परंतु वकिलांनी हा दावा फेटाळला. शेहजाद गेल्या सात वर्षांपासून भारतात राहत असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय संबंध नसल्याचेही वकिलांनी स्पष्ट केले.