कर्करोगाशी झुंज अपयशी, कराटे अन् तिरदांजीत पारंगत अभिनेत्याचे निधन
प्रसिद्ध अभिनेते, कराटे व तिरंदाजी तज्ज्ञ शिहान हुसैनी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ६० वर्षांचे हुसैनी रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबियांनी फेसबुकवर दिली. चेन्नईतील निवासस्थानी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. हुसैनी यांनी १९८६ मध्ये 'पुन्नागाई मन्नन' चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.