अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या ३८ वर्षीय मुलीचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन
तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या मुली गायत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ती अवघ्या ३८ वर्षांची होती. शुक्रवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तिला हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान तिचं निधन झालं. गायत्री विवाहित होती आणि तिला दोन लहान मुलं आहेत. तिच्या निधनानंतर तेलुगू सिनेसृष्टीतील अनेकांनी राजेंद्र प्रसाद यांना शोक व्यक्त केला.