प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि चित्रपट निर्माता सुदीप पांडे याचे १५ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या ३० वर्षांच्या सुदीपने भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. सुदीप सॉफ्टवेअर इंजिनिअरही होता. त्याच्या निधनाने चाहते आणि सहकलाकार सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत आहेत. सुदीपने 'पारो पटना वाली' या आगामी चित्रपटात काम करत होता. त्याने बिहार टुरीझमसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही काम केले होते.