वरुण धवनच्या हिरोईनने गोव्यात केलं लग्न, दुबईतील बिझनेसमनशी बांधली लग्नबंधनात
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने गोव्यात तिचा बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलशी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. तिने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कीर्ती व अँटनी १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. कीर्ती लवकरच वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कीर्तीला 'महानती' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.