खिडकीच्या जाळीवर ढकललं अन्…, मुंबई लोकलमध्ये अभिनेत्रीबरोबर तरुणाने केलेलं गैरवर्तन
दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहननने मुंबई लोकलमध्ये घडलेला वाईट अनुभव शेअर केला. कॉलेजच्या दिवसात रात्री ९.३० वाजता फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करताना एका तरुणाने तिच्या चेहऱ्यावर जाळीवर ढकलून 'किस देशील का?' विचारले. या घटनेने तिला आणि तिच्या मैत्रिणींना धक्का बसला. मालविकाने सांगितले की, मुंबईत स्वतःची कार असणाऱ्यांसाठी सुरक्षितता आहे, पण सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.