“माझा घटस्फोट…”, समांथा तेलंगणा मंत्र्यांच्या ‘त्या’ दाव्यावर संतापली; म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणाच्या काँग्रेस नेत्या कोंडा सुरेखा यांनी विधान केल्याने समांथा संतप्त झाली. सुरेखा यांनी केटीआर यांच्यावर टीका करताना समांथा-नागा चैतन्य यांच्या विभक्त होण्याचा उल्लेख केला. समांथाने इन्स्टाग्रामवर सुरेखा यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आणि तिचा घटस्फोट ही खासगी बाब असल्याचे स्पष्ट केले.