कंगना रणौत यांना दिलासा, ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटींवर परवानगी!
अभिनेत्री खासदार कंगना रणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाली आहे. काही शीख संघटनांनी चित्रपटातील दृश्ये व संदर्भांवर आक्षेप घेत बंदीची मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाने तीन प्रकारचे संदर्भ गाळण्याच्या व काही ऐतिहासिक व्यक्तींच्या संवादांना सत्याधारित संदर्भ देण्याच्या अटीवर चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली आहे.