अभिनेत्री अलका कुबल यांची संतप्त प्रतिक्रिया; “…तर मुलींनी बापाचा खून करायला हवा”
अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमध्ये खानदेश करिअर महोत्सवात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, जर बापच मुलींवर अत्याचार करत असेल तर मुलींनी त्याचा खून करायला हवा. बलात्काराच्या घटनांवर कठोर कायदे हवेत, जसे आखाती देशांमध्ये आहेत. मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.