इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमाचं नेमकं स्वरुप काय?
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्यानंतर देशभरात संताप व्यक्त झाला आहे. मुंबई आणि आसाममध्ये रणवीर, अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो समय रैनाने यूट्यूबवर लाँच केला असून, यात स्पर्धकांना त्यांच्या अनोख्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी दिली जाते. शोमध्ये डार्क कॉमेडी आणि अश्लील टिप्पण्या केल्या जातात.