Video: अर्जुनला तुरुंगात घालवावी रात्र, सुटकेनंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी 'पुष्पा 2' च्या प्रिमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याने अटक करण्यात आली होती. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तेलंगणा हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शनिवारी एएनआयने त्याचा घरी जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.