Video: अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यावर पत्नीला अश्रू आवरेना, मिठी मारून रडू लागली स्नेहा
तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, त्याची पत्नी स्नेहा रेड्डी त्याला भेटायला आली. चंचलगुडा कारागृहात एक रात्र घालवल्यानंतर अल्लू अर्जुन घरी पोहोचला, जिथे चाहत्यांची गर्दी होती. स्नेहा रेड्डीने अल्लू अर्जुनला मिठी मारून रडू लागली, आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्लू अर्जुनने अटक होण्यापूर्वी पत्नीला हसवण्याचा प्रयत्न केला होता.