प्रसिद्ध अभिनेत्रीचा घरात आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याची माहिती; ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची
हॉलीवूडमधून दुःखद बातमी आली आहे. 'बेवॉच' आणि 'नाइट रायडर'मधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पामेला बाक हिचे ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. तिने आत्महत्या केली असून, तिच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. पामेला ५ मार्च रोजी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या माजी पती डेव्हिड हॅसलहॉफने कुटुंबाला प्रायव्हसी देण्याची विनंती केली आहे.