भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्यांनी लोकप्रिय गायिकेशी केलं लग्न, सोहळ्यातील फोटो आले समोर
भारतीय जनता पार्टीचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकप्रिय गायिका शिवश्री स्कंदप्रसादशी ६ मार्च रोजी विवाह केला. दक्षिण बेंगळुरूचे खासदार असलेल्या तेजस्वी यांच्या लग्नाला कुटुंबीय व मोजके पाहुणे उपस्थित होते. शिवश्री ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने बायोइंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर दोन लाख सबस्क्रायबर्स आहेत. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.