Video: “मधेमधे तिच्या तोंडून…”, पॅडी कांबळेने निक्कीला भरवला कडू लाडू अन् म्हणाला…
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात गणपती स्पेशल 'भाऊचा धक्का' सुरू आहे. शनिवारी, रितेश देशमुखने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या निक्की तांबोळीला चांगलंच सुनावलं आणि शिक्षा दिल्या. अरबाज पटेललाही रितेशने फटकारलं. त्यानंतर घनःश्याम दरवडे घराबाहेर झाला. आज पंढरीनाथ कांबळे निक्कीला कडू लाडू भरवताना दिसणार आहे.