रिया चक्रवर्ती, भारती सिंगसह ‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्याला दिल्ली पोलिसांचा समन्स
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात रियासह लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग आणि ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता, लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवचं देखील नाव सामील आहे. या प्रकरणात अनेक युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरची नाव असून दिल्ली पोलिसांनी चौकशासाठी यांना समन्स बजावला आहे.