सेलिब्रिटी जोडपं होणार आई-बाबा, लग्नानंतर ५ महिन्यांनी दिली गुड न्यूज
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक यांनी लग्नानंतर पाच महिन्यांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावर जाहीर केली आहे. त्यांनी तीन फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या या जोडप्याने २२ ऑगस्ट २०२४ रोजी कूर्गमध्ये लग्न केले होते. चाहत्यांनी या नवीन प्रवासासाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.